Lohgad
- Ameya Chousalkar
- May 1, 2013
- 1 min read

किल्ले लोहगड! अनेक डोंगराळ किल्ल्यांपैकी एक! सध्याचे hill station असलेल्या लोणावळा आणि पुण्याच्या वायव्येस साधारण पणे ५२ की. मी. अंतरावर असलेला हा गड!जवळच असलेल्या विसापूर गडाला एका शोर्ट रेंज ने जोडला गेलेला, हा गड मराठा साम्राज्यात एका मोठ्या कालावधी साठी होता. सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकूट, यादव, बहामाज, निझाम, मुघल आणि मराठे ह्यांसारख्या सत्ता पाहिलेला हा गड. शिवरायांनी हा गड इ. स. १६४८ मध्ये जिंकला, मात्र नंतर पुरंदर च्या तहात (इ.स. १६६५) हा मुगलांना द्यावा लागला. मात्र ५ वर्षांच्या छोट्या कालावधी नंतर हा गड महाराजांनी परत जिंकून घेतला आणि त्या नंतर हा सुरत ची लूट ठेवण्यासाठी वापरला गेला असे मानले जाते. ह्या नंतर पेशव्यांच्या काळात नाना फडणवीस ह्यांचे काही काळ ह्या गडाला वास्तव्य लाभले. ह्या काळात त्यांनी बऱ्याच संरचना बांधल्या. अलीकडल्या काही वर्षात ह्या गडाला एक संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले आहे.
Comments