Bhairavgad
- chousalkarameya
- May 1, 2013
- 1 min read
भैरवगड मोरोशी, कल्याण ते माळशेज घाटातून प्रवास करत असताना मोरोशी जवळ एक अतिशय शार्प सुळका वेगळा झालेला दिसतो, तो भैरवगड. चढायला अगदी कठीण असलेला हा गड कोकण पट्टीतला एक महत्वाचा गड समजला जातो. ह्या किल्ल्याच्या टोकावर भून्दक म्हणून एक भूगर्भीय रचना तयार झालेली आहे. तसेच साधारण १०० फुटांचे rappelling ह्या ट्रेक ला अजूनच रोमांचक बनवून जाते. हा किल्ला अतिशय प्राचीन किल्ल्यांपैकी मानला जातो, साधारण २५०० वर्षे जुना. किल्ल्यावर अतिशय कमी असे अवशेष सापडले गेले आहेत मात्र, ह्याची अतिशय उथळ प्रकारची भिंत रचना अतिशय दुर्मिळ अशी समजली जाते.
Comments