Torna (Prachandagad)
- chousalkarameya
- Apr 1, 2013
- 1 min read
किल्ले तोरणा. सह्याद्री तालुक्यातील नैरुत्य दिशेस ७० की.मी. वर वसलेला, पुणे तालुक्यातील सर्वात उंच किल्ला, प्रचंडगड म्हणून पण ओळखला जाणारा गड म्हणजे तोरणा! नाव प्रमाणेच प्रचंड, बलाढ्य..असा हा गड महाराष्ट्रातील क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा गड आहे. ह्या गडाचे विशीष्ट म्हणजे, वयाच्या १६व्या वर्षी शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला गड आहे! हा गड १३व्य शतकात शिवपंथीय लोकांनी बांधला असल्याचे मानले जाते. गडावर मेंघाईदेवीचे मंदिर मुख्य प्रवेशद्वाराजवळ भटक्यांचे
लक्ष वेधून घेते. १६व्या वर्षी महाराजांनी हा गड जिंकून मराठा साम्राज्याचा पाया रचला. गड जिंकल्यावर महाराजांनी गडावर अनेक स्मारके आणि बुरुज बांधून 'प्रचंडगड' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ह्या गडाचे नाव बदलून 'तोरणा' असे ठेवले. साम्भूराजेंच्या हत्येनंतर १८व्या शतकात मुगलांनी हा किल्ला मराठ्यांकडून जिंकला. ह्यानंतर अतिशय कठीण परिस्थितून मुगलांनी हा गड काबीज केल्याने औरंगजेबाने ह्याचे नाव फुतुल्गैब (दैवी विजय) म्हणून ठेवले. ह्या नंतर पुरंदरच्या तहामध्ये मराठ्यांनी हा गड परत मिळवला. गडावरील मेंघाई देवीचे मंदिर आणि झुंजार बुरूजा सारखे बरेच spots भटक्यांचे आकर्षण बनले आहेत!

Comments